Pasaydan Lyrics is a PRAYER written by Saint(Sant) DNYANESHWAR. He was the Hindu poet, philosopher, and yogi of the Thirteenth Century. Sant Dnyaneshwar is well known for writing Dnyaneshwari which is a simple form of the Bhagavad Gita. Pasaydan is an abstract of nine thousand (9000) stanzas (ओव्या ) of Dnyaneshwari.
Song Credits
Song Title | Pasaydan |
Singer | Lata Mangeshkar |
Composer | Traditional |
Lyrics | Sant Dnyaneshwar |
Music Label | Saregama Music |
Pasaydan Lyrics with Meaning
Pasaydan Lyrics in Marathi
आता विश्वात्मकें देवें | येणें वाग्यज्ञें तोषावें |
तोषोनिं मज द्यावे | पसायदान हें || १ ||
१. संत ज्ञानेश्वर प्रार्थना करत आहेत की त्यांच्या वाणीतून जी ज्ञानेश्वरीची रचना झाली आहे त्यावर देव संतुष्ट होवो, प्रसन्न होवो आणि त्याचा कृपाप्रसाद ( पसायदान ) मिळो. हा कृपाप्रसाद (भिक्षा) ते पुढील ओव्यांमध्ये वर्णन करतात.
(त्यांचे गुरु संत निवृत्तीनाथ ह्यांना ते विश्वरूपी देव संबोधतात )
जे खळांची व्यंकटी सांडो | तया सत्कर्मी रति वाढो | भूतां परस्परें पड़ो | मैत्र जीवांचे || २ ||
२. वाईट लोकांच्या मनातील दुष्टपणा नष्ट होवो आणि त्यांची सत्कर्माची गोडी वाढो. सर्व प्राणिमात्रांमध्ये मैत्री वाढो.
दुरितांचे तिमिर जावो | विश्व स्वधर्मसूर्ये पाहो |
जो जे वांछिल तो तें लाहो | प्राणिजात || ३ ||
३. सर्व विश्वातील प्राणिमात्रांमधील अज्ञानाचा अंधार दूर होवो. विश्वातील सर्वानी स्वधर्म प्रामाणिकपणे पालन करावा. ज्याला जे हवय ते मिळो. (येथे अगोदरच्या ओळीचा संदर्भ घेऊन अर्थ जाणून घ्यावा तो असा की सर्वांनी स्वधर्माचं पालन केलं तर नकळतच ज्याला जे हवय ते मिळू शकणार आहे ).
(स्वधर्म meaning: आपलं आपलं नेमून दिलेलं काम प्रामाणिकपणे करणं )
वर्षत सकळ मंगळी | ईश्वर निष्ठांची मांदियाळी |
अनवरत भूमंडळी | भेटतु भूतां || ४ ||
४. संपूर्ण जगावर कल्याणाचा वर्षाव करणारे असे ईश्वरनिष्ठ लोक अखंडपणे दाटीवाटीनं उत्पन्न होवो आणि त्यांचा सहवास सर्व प्राणिमात्रांना सतत घडत राहो.
चला कल्पतरूंचे आरव | चेतना चिंतामणींचें गांव |
बोलते जे अर्णव | पीयुषाचे || ५ ||
५. जगातील सर्व माणसे ईश्वरनिष्ठ बनावीत असे संत ज्ञानेश्वर म्हणत आहेत आणि अशा माणसांची कल्पना ते ओवी क्रमांक ५, ६ आणि ७ मध्ये वर्णन करत आहेत.
ईश्वरनिष्ठ लोकांचा समुदाय हा कल्पवृक्षांची चालतीबोलती उद्याने आहेत.
ईश्वरनिष्ठ लोक जेथे राहतात ते जणू चिंतामणींचे गावच आहे.
शिवाय ते अमृतासारखे बोलणारे समुद्रच आहेत.
(ईश्वरनिष्ठ meaning: भग्वदगीतेचे अनुयायी )
(कल्पवृक्ष meaning: असे म्हटले जाते की कल्पवृक्ष मनातल्या सर्व कल्पना पूर्ण करते )
(चिंतामणी meaning: असे म्हटले जाते की चिंतामणी रत्न मनातल्या सगळ्या चिंता दूर करते )
चंद्रमे जे अलांछन | मार्तंड जे तापहीन |
ते सर्वांही सदा सज्जन | सोयरे होतु || ६ ||
६. हे ईश्वरनिष्ठ चंद्रासारखे शीतल आणि निष्कलंक (लांछन नसलेला)असतात. त्यांचा ज्ञानाचा प्रकाश खूप प्रखर असतो, पण सूर्यासारखा भाजून निघेल एवढाही नसतो. असे हे सगळे सर्वांसाठी सज्जन आणि जिवलग होवोत.
किंबहुना सर्व सुखी | पूर्ण होऊनि तिहीं लोकीं |
भजिजो आदिपुरुखी | अखंडित || ७ ||
७. हे ईश्वरनिष्ठ लोक असे आहेत की जे तिन्ही लोकांमधे सर्वसुखीं होऊनही, परिपूर्ण होऊनही, आदिपुरुषांची अखंडित उपासना करतात.
आणि ग्रंथोपजीविये | विशेषीं लोकीं इये |
दृष्टादृष्ट विजयें | होआवें जी || ८ ||
८. संत ज्ञानेश्वर म्हणतात की ज्यांनी ह्या ग्रंथाचे ( भग्वदगीतेचे ) तंतोतंत पालन केले आहे अश्या सर्व लोकांना दृश्य आणि अदृश्य अश्या सर्व गोष्टींवर (लालसांनवर) विजय मिळो आणि फक्त विश्व कल्याणाचीच इच्छा शिल्लक राहो.
येथ म्हणे श्रीविश्वेशराओं | हा होईल दान पसावो |
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला || ९ ||
९. येथे श्रीविश्वेशर (संत निवृत्तीनाथ) संत ज्ञानेश्वरांना तुला तू इच्छित असलेला कृपाप्रसाद नक्कीच मिळेल असा आशीर्वाद देत आहेत. ह्या गोष्टीमुळे संत ज्ञानेश्वर सुखी झाले आहेत.
Written By: Sant Dnyaneshwar
Note: Freinds Please note that the above Meaning is the meaning that I have understood as per my knowledge, you may explore more for details as per your interest.
You May Also Like
- Ram Raksha Stotra Lyrics
- Maruti Stotra – Bhimrupi Maharudra Lyrics
- Sada Sarvada Yog Tuza Ghadava Lyrics
Pasaydan Lyrics in English
Aata Vishwatma Ke Deve | Yene Vagyadnye Toshave |
Toshoni Maj Dyave Pasaydan He || 1 ||
Je Khalanchi Vyankati Sando | Taya Satkarmi Rati Vadho |
Bhutaan Paraspare Pado | Maitra Jeevanche || 2 ||
Duritaanche Timir Jaavo | Vishv Swadharma Surye Paaho |
Jo Je Vanchhil To Te Laho | Pranijaat || 3 ||
Varshat Sakal Mangali | Ishwar Nishthanchi Mandiyali |
Anvarat Bhumandali | Bhetatu Bhutan || 4 ||
Chala Kalptarunche Aarav | Chetana Chintamaniche Gaanv |
Bolate Je Arnav | Piyushache || 5 ||
Chandrame Je Alanchhan | Martand Je Taaphin |
Te Sarvanhi Sada Sajjan | Soyare Hotu || 6 ||
Kimbhuna Sarv Sukhi | Purn Houni Tinhi Lonki |
Bhajijo Aadipurukhi | Akhandit || 7 ||
Aani Granthopjiviye | Visheshi Lonki Iye
Drushtasrusht Vijayein | Hoaavein Ji || 8 ||
Yeth Mhane Shrivishvesharaon | Ha Hoeil Daan Pasavo |
Yene Vare Dnyandevo | Sukhiya Jhala || 9 ||
Pasaydan Lyrics In Voice Of Lata Mangeshkar
Here we end up with the Pasaydan Lyrics in Marathi and English with Meaning in Marathi.