Sinhasani Baisale Shambhu Raje from the movie “Shivrayancha Chhava” is a Marathi language song sung by Kailash Kher. Sinhasani Baisale Shambhu Raje Song was written by Digpal Lanjekar and composed by Devdutta Manisha Baji. Listen and Read the Lyrics of Sinhasani Baisale Shambhu Raje online only at signaturelyrics.com.
Sinhasani Baisale Shambhu Raje Song Details
Bhajan | सिंहासनी बैसले शंभू राजे |
Language | Marathi |
Album | शिवरायांचा छावा |
Singer | Kailash Kher |
Music Composer | Devdutta Manisha Baji |
Lyrics | Digpal Lanjekar |
Music Label | Everest Marathi |
Sinhasani Baisale Shambhu Raje Lyrics in Marathi
शंभू राजे! शंभू राजे!
शंभू राजे! आरं शंभू राजे
शंभू राजे!
सिंहासनी रुद्र बैसलं शंभू राजं
शिवरायांच्या प्रिय रायगडी (शंभू राजे!)
सिंहासनी रुद्र बैसलं शंभू राजं
शिवरायांच्या प्रिय रायगडी
पोरक्या या मातीचं रं डोळं पुसलं
नायक हा रयतेच्या मनी
रूपानं ह्याचा सारं आदित झकोळलं
तेज ते तेजाळलं डोळ्यातुनि
ऐशी ही ह्याची मती
वाऱ्याची थांबे गती
वैर्याला मात देती रणातूनी
सिंहासनी रुद्र बैसलं शंभू राजं
शिवरायांच्या प्रिय रायगडी
पोरक्या या मातीचं रं डोळं पुसलं
नायक हा रयतेच्या मनी
रयतेच्या मनी हा संतोष दाटला
शंभूराजं आलं रं
हजारो कंठातून जयघोष घुमला
शंभूराजं आलं रं
(सिंहाचा छावा रं, शंभूराजं आलं रं)
शिवराय स्वप्नाचे नवे तेज
गगनात भगवा नाचे ध्वज
स्वराज्य शिरी हा नवा साज
पुन्यांदा अवतरलं रामराज
पुन्यांदा अवतरलं रामराज
मावळ वीरांचा डंका वाजं
दिशादिशांना नावं गाजं
सवाई मल्हार त्ये शंभू राजं
जगणं सुखावलं
रोजच सन झालं
शंभूचं राज्य आलं रं
संतांचं ज्ञान आज
धर्माचं भान आज
शंभूनं दान दिलं रं
सिंहासनी रुद्र बैसलं शंभू राजं
शिवरायांच्या प्रिय रायगडी
पोरक्या या मातीचं रं डोळं पुसलं
नायक हा रयतेच्या मनी
सेना गर्जे धडक-धडक देती
अश्व रगेने तडक-फडक होती
तोफा जळती भडक-भडक भीती गनिमा बसते रे
सेना गर्जे धडक-धडक देती
अश्व रगेने तडक-फडक होती
तोफा जळती भडक-भडक भीती गनिमा बसते रे
मावळची ती वाढे आशा
साम्राज्याची ती अभिलाषा
शंभूरूप ती भाग्य शलाका भाळी उमटे रे
घेवोनी अशी मुसंडी
शत्रूचे भान उडावे
रणी झुंज झुंज झुंजत
अन् धारातीर्थी पडावे
मावळच्या दिलदारांचे
हे ब्रीद असे जन्माचे
रक्ताचे आहे मोल
दिधलेल्या निज वचनाचे
असूदाने आहे भिजली
हर एक इथे तलवार
वीरांनी सजला आहे
नृप शंभूचा दरबार
हो राजे तुम्ही व्हा पुढती
तुम्ही असता कसली भीती
शंभू राजं अंतिम शब्द
ही मराठ्यांची नीती
तुमच्या आज्ञेने आता
गनिमास नीट भीडावे
हे निशाण जरी पट्याचे
अन दिल्ली वरती चढावे
सूर्याच्या तप्त आभाळी
ही गरुडाची रे झेप
जाहला बघा संपूर्ण
नृप शंभूचा अभिषेक
सिंहासनी रुद्र बैसलं शंभू राजं
शिवरायांच्या प्रिय रायगडी
पोरक्या या मातीचं रं डोळं पुसलं
नायक हा रयतेच्या मनी
सिंहासनी रुद्र बैसलं शंभू राजं
शिवरायांच्या प्रिय रायगडी
पोरक्या या मातीचं रं डोळं पुसलं
नायक हा रयतेच्या मनी
Written By: Digpal Lanjekar
More songs by Digpal Lanjekar
- Vaara Ga Mandi Vaar Lyrics – Shivrayancha Chhava
- Jijau Prashasti Lyrics – Subhedar
- Aale Marathe Lyrics – Subhedar
- Shivba Raja Lyrics – Sher Shivraj
- Yelkot Devacha Lyrics – Sher Shivraj
- Raja Aala Lyrics – Pawankhind
- Shwasat Raja Dhyasat Raja Lyrics – Pawankhind