San Varsacha Aala Gauri Ganpaticha Lyrics sung by Sonali Bhoir, Parmesh Mali is a New Marathi Ganpati Song written by Pramod Madhavi, and Manoj Bhole while the music is mix-mastered by Vishal Bhoir.
Song Credits
Song Title | सन वरसाचा आला गौरी गणपतीचा |
Singer | सोनाली भोईर, परमेश माळी |
Mix-Master | विशाल भोईर |
Lyrics | प्रमोद माधवी, मनोज भोळे |
Featuring | सोनाली भोईर, समय कालन |
Music Label | Sonali Bhoir Official |
San Varsacha Aala Gauri Ganpaticha Lyrics in Marathi
ए ताई माई ताई गो सई माई सई
लाडाची माझी बहिणाबाई
निरोप धाडला आई बाबाई
ताई माझी सजली जशी गौराई
आला बंधु नेवाला ला राजा
सन वरसाचा आला आला माझा गौरी गणपतीचा
माझा गौरी गणपतीचा
सन वरसाचा आला आला माझा गौरी गणपतीचा
माझा गौरी गणपतीचा
आला वरसाचा देव पाहुणा बसवा पाटावरी
(बसवा पाटावरी, बसवा पाटावरी)
चिक मोत्यांची माळ शोभते गनाच्या अंगावरी
(गनाच्या अंगावरी, गनाच्या अंगावरी)
हे मखारी बसलाय विश्वाचा राजा
शोभून दिसतोय गणपती माझा
मखारी बसलाय विश्वाचा राजा
शोभून दिसतोय गणपती माझा
गाली हसतो बाळ गौरीचा
सन वरसाचा आला आला माझा गौरी गणपतीचा
माझा गौरी गणपतीचा
सन वरसाचा आला आला माझा गौरी गणपतीचा
माझा गौरी गणपतीचा
गणराया आले घरा राया आले घरा
आनंद सांगू जगाला
गणराया आले घरा राया आले घरा
आनंद सांगू जगाला
दीड दिवसाची आली गौराई माझी
घर माझा कसा फुलला
दीड दिवसाची आली गौराई माझी
घर माझा कसा फुलला
आरं आरं दादा माझे आरं दादा माझे
ये रं गाण्यावर नाचाला
आरं आरं दादा माझे आरं दादा माझे
ये रं गाण्यावर नाचाला
फेर काही धरियेला फेर धरियेला
गनाचे बैठकीला
फेर काही धरियेला फेर धरियेला
गनाचे बैठकीला
आला घेउनी माझ्या घराला आनंद रे गणराया
(आनंद रे गणराया, आनंद रे गणराया)
भक्तिभावाने तुला पुजिला ठेव सुखाची तू रे छाया
(सुखाची तू रे छाया, सुखाची तू रे छाया)
ए ताई माई ताई हिची झाली गो घाई
बापाचा नैवेद्य घेऊन येई
आया बायांची झाली गो घाई
बापाचा नैवेद्य घेऊन येई
चाट मोदक पूरणपोळीचा
सन वरसाचा आला आला माझा गौरी गणपतीचा
माझा गौरी गणपतीचा
सन वरसाचा आला आला माझा गौरी गणपतीचा
माझा गौरी गणपतीचा
लय लाडाच्या साऱ्या लेकी या
आल्या गं माहेराला
लय लाडाच्या साऱ्या लेकी या
आल्या गं माहेराला
साऱ्या बहिणीशी आज भेटल्या
झाला आनंद गो मनाला
साऱ्या बहिणीशी आज भेटल्या
झाला आनंद गो मनाला
गेला हर्षून सारा घरदार बघ जसा गोकुलला
गेला हर्षून सारा घरदार बघ जसा गोकुलला
राहू दे सुखानं गं माझे माहेराला
हेच मागणं गणरायाला
राहू दे सुखानं गं माझे माहेराला
हेच मागणं गणरायाला
ए ताई माई ताई गो सई माई सई
लाडाची माझी बहिणाबाई
किती गं प्रेमळ भाऊराया माझा
असाच राहू दे जीव सदा तुझा
नाही मोह मला कशाचा
सन वरसाचा आला आला माझा हौसचा मौजचा
आला गौरी गणपतीचा
सन वरसाचा आला आला माझा हौसचा मौजचा
आला गौरी गणपतीचा
सन वरसाचा आला आला माझा हौसचा मौजचा
आला गौरी गणपतीचा
सन वरसाचा आला आला माझा हौसचा मौजचा
आला गौरी गणपतीचा
Written By: Pramod Madhavi, Manoj Bhole
You May Also Like
- Maza Bappa Aala Lyrics – Adarsh Shinde
- Morya Morya Lyrics – Ajay-Atul
- Morya Re Lyrics – Jasraj Joshi
- Deva Ho Deva Lyrics – Sukhwinder Singh
- Ya Re Ya Sare Ya Lyrics – Ventilator